नागपूर : नागपूरमध्ये 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात काल रात्री उशिरा पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पांडे असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. या प्रकरणात आरोपीने मुलाचं अपहरण केलं आणि त्यानंतर मुलाच्या सुटकेच्या बदल्यात खंडणी म्हणून पैसे ना मागता त्या मुलाच्या काकांचे मुंडके आणा आणि मुलाला घेऊन जा, अशी मागणी केली होती. मात्र तसे झाले नाही आणि पोलीस मागावर लागल्याचे कळताच आरोपीने मुलाला मारुन टाकले. निरागस राजूला नाहक आपला जीव गमवावा लागला. त्याचा मृतदेह हुडकेश्वर खुर्द जवळ आढळला. दरम्यान, पोलिसांनी राजूचा मृतदेह ताब्यात घेऊन नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलीस तपासात राजूच्या अपहरणामागचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. हत्या झालेल्या मुलाच्या काकाने आरोपीच्या आईचे शोषण केले होते. याचाच राग मनात धरून आरोपीने बदला घेण्याचे ठरवले आणि गुरुवारी संध्याकाळी राजूचे अपहरण केले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी सुरज साहू याला बोरखेडी इथून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणात नाहक आपला जीव गमावलेल्या राजुच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
विकृतीचा कळस! महिलेने पतीची हत्या केली, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पॅनमध्ये शिजवला…
महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून केली आत्महत्या, कारण…