kulbhushan jadhav can now appeal against conviction

कुलभूषण जाधव यांना दिलासा, शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी

ग्लोबल देश

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीने कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ कोर्टात अपील करण्याची मंजुरी देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. कुलभूषण जाधव यांना या शिक्षेविरोधात अपील करण्याचाही अधिकार नव्हता. या मुद्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला सुनावले होते. नॅशनल असेम्ब्लीने मंजूर केलेल्या विधेयकानुसार, आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मृत्यूदंडाच्या शिक्षेची समीक्षा करणे आणि शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठीचे अधिकार देण्यात आले आहेत. कुलभूषण जाधव यांना आता शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी मिळणार आहे.

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील ‘रॉ’साठी काम करीत असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अखेर त्यांच्या फाशीला स्थगिती दिली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत