Woman Needs Liver Transplant As Her Body Makes Alcohol

मद्यपान न करताच महिलेच्या शरीरात तयार होते अल्कोहोल, यकृत प्रत्यारोपण करण्याची आली वेळ

ग्लोबल लाइफ स्टाइल

अमेरिकेत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेतील सारा लिफर नावाची 38 वर्षीय महिला अल्कोहोल घेत नाही, परंतु ती नशेत असते. हे त्या आजारामुळे आहे ज्याचा सामना सारा करीत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या वर्षी फेब्रुवारीत साराला समजले की ती ऑटो-ब्रीवरी सिंड्रोमशी (Auto-Brewery Syndrome) झगडत आहे. तज्ञांच्या मते, अशा सिंड्रोममध्ये शरीरात यीस्ट इथेनॉल तयार करण्यास सुरुवात करते, जे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. हे अल्कोहोल तयार झाल्यावर थेट रक्तामध्ये मिसळते आणि संपूर्ण शरीरात पोहोचते. परिणामी, हा सिंड्रोम असलेला रुग्ण नेहमी नशेत राहतो.

दोन मुलांची आई असलेल्या साराच्या म्हणण्यानुसार, याची सुरुवात वयाच्या 20 व्या वर्षी झाली होती. मी खूप अस्वस्थ आहे, कारण बऱ्याचदा डॉक्टर माझा हा आजार स्वीकारायलाच नकार देतात. आता परिस्थिती इतकी बिघडली आहे कि, यकृत प्रत्यारोपण करण्याची वेळ आली आहे.

साराला सध्या एंटी-फंगल औषधे दिली जात आहेत, जेणेकरून परिस्थिती आणखी खराब होऊ नये आणि यकृत प्रत्यारोपण करता येऊ शकेल. यकृत सिरोसिस झाल्यानंतर गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी जेव्हा टेस्ट केल्या गेल्या, तेव्हा चाचणीमध्ये अल्कोहोलची पातळी खूप जास्त होती. अहवालानुसार, हे ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ च्या मानकांपेक्षा 6 पट जास्त आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत