French air strike

आफ्रिकन देश मालीमध्ये फ्रान्सच्या हवाई दलाने केला एअर स्ट्राइक, ५० दहशतवादी ठार

ग्लोबल

आफ्रिकन देश मालीमध्ये असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्यांवर फ्रान्सच्या हवाई दलाने जोरदार हवाई हल्ले सुरू केले. फ्रान्स हवाई दलाच्या मिराज लढाऊ विमाने आणि ड्रोन विमानांनी ही कामगिरी केली. मालीमध्ये केलेल्या एअर स्ट्राइक मध्ये अल कायदाचे जवळपास ५० दहशतवादी ठार झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या हवाई दलाने ३० ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. यामध्ये ५० अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. त्याशिवाय त्यांच्या शस्त्रसाठ्याचेही नुकसान झाले आहे. चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात फ्रान्सच्या सैन्याला यश आले आहे. त्यांच्याकडून आत्मघाती हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे कोट, स्फोटकेही सापडली आहेत. बुर्कीन फासो आणि नायजरजवळील सीमावर्ती भागात शुक्रवारी हा एअर स्ट्राइक करण्यात आला.

एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा अल कायदाशी संबंध होता. हे दहशतवादी ग्रुप ऑफ इस्लाम अॅण्ड मुस्लिम संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती फ्रान्स सरकारने दिली. हे दहशतवादी एकत्रपणे गटाने मोटारसायकलवरून प्रवास करत होते. त्यावेळी फ्रान्सच्या ड्रोनने यांना पाहिले आणि त्यानंतर एअर स्ट्राइकची कारवाई करण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत