More than 200 BJP workers join NCP in the presence of Eknath Khadse

एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत भाजपच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र

जळगाव : एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या मतदार संघातच खडसेंनी फूट पाडली आहे. जामनेरयेथील २०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यापासून जळगावातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदधिकारी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आज २०० हून अधिक कार्यकर्यांनी खडसेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा राज्यातील भाजप नेतृत्वासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे. एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

जामनेर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे कार्यकर्ते यापूर्वी भाजपचे नि:स्वार्थपणे काम करत होते. त्यातील काही कार्यकर्ते हे भाजपचे पदाधिकारी होते, तर काही कार्यकर्ते हे आजही भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करत होते. परंतु, अलीकडे ते पक्ष नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. यापुढच्या काळात असे अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिक बळकटी येईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

भाजप सरकारच्या काळात जळगावात एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यातच गिरीश महाजन यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना वेळोवेळी डावललं असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. यामुळंच, जळगावात खडसे आणि महाजन असे दोन गट तयार झाले आहेत.

खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपला आव्हान दिलं होतं. जळगावात चारी बाजूला फक्त राष्ट्रवादीच असणार असा दावाच त्यांनी केला होता. तसंच, भाजपवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याने ते आपले राजीनामे देत आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत