rain in maharashtra for next three days

आज ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट

महाराष्ट्र मुंबई

पुणे : राज्यात येत्या पाच दिवसांत तीव्र हवामान सक्रिय राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दक्षिण कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रावर तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भाग अंशतः ढगाळलेले होते. येत्या पाच दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता आहे. आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

अकोला, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत