सातारा : मानवी वस्तींमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे. हा वावर कमी करण्यासाठी वन विभागाने व वन्यजीव विभागाने उपाययोजना कराव्यात. मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरुन न जाता नागरिकांनी तात्काळ वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पालकमंत्री कार्यालयात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर यावर करावयाच्या उपायोजनांसदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला […]
टॅग: सातारा
राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतिगृहे सुरू; उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्येही जागा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी राज्यात 65 नवी वसतिगृहे सुरू करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. दहा–बारा वर्षे अडकलेला प्रश्न मार्गी […]
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द
मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर […]
राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ११ जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुणे : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रात […]
राज्यातील ३८ नवीन सब स्टेशन उभारणी, वीज वाहिन्यांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करावीत – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना या विकासासाठी उद्योग, कृषी आणि विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात वीज ऊर्जेची गरज भासणार आहे यासाठी महावितरणमार्फत उभारण्यात येणाऱ्या 38 नवीन सब स्टेशन आणि वीज वाहिन्यांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जावे, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. एमएसईबी होल्डिंग कंपनी […]
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]
राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 25 ते […]
सातारा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम, संपूर्ण घरपट्टी भरलेल्या सातारकरांना मोफत राष्ट्रध्वज
सातारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा नगरपरिषदेमार्फत ज्या मिळकतधारकांनी 1 एप्रिल 2022 पासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे, त्यांना मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी दिली. ज्या नागरिकांनी 1 एप्रिल 2022 पासून आपली घरपट्टी भरलेली आहे त्यांनी सातारा नगरपरिषद सातारा मुख्य कार्यालय, नगरपरिषद कार्यालय सदरबझार, नगरपरिषद कार्यालय […]
आज ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट
पुणे : राज्यात येत्या पाच दिवसांत तीव्र हवामान सक्रिय राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रावर तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील […]
पुढील 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा इशारा
मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत आयसोल ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. बाहेर पडताना खबरदारी घ्यावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत विजांच्या […]










