मुंबई : राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात 25 ते 26 ऑगस्टपर्यंत मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील. विदर्भातही 10 जिल्ह्यात दोन दिवसाच्या उघडीपीनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या 4 जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी व परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD GFS मोडेल नुसार, कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3,4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढचे 2 दिवस. pic.twitter.com/Bh1tanYSsd
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 20, 2022
मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात व विदर्भात मंगळवारपासून काहीशी उघडीप जाणवली तरी तुरळक ठिकाणी किरकोळ व हलक्या पावसाची शक्यता पुढील आठवडाभर कायम राहणार आहे.




