KRK Changed His Name On Twitter As Kamaal Rashid Kumar By Removing Khan Surname
मनोरंजन

KRK ने ट्विटर हँडलवर बदललं स्वतःच नाव, ‘खान’ हटवून लावलं पत्नीचं आडनाव…

मुंबई : अभिनेता कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके सोशल मीडियावर त्याच्या काही ट्वीट्स किंवा वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. बॉलीवूडला दररोज टार्गेट करणारा केआरके जवळपास प्रत्येक चित्रपटाबद्दल आपले विचार लोकांसोबत शेअर करतो. आपल्या चित्रपटांच्या रिव्ह्यूजमुळे नेहमीच चर्चेत असणार्‍या केआरकेने पुन्हा एकदा आपल्या एका ट्विटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केआरकेने ट्विटर हँडलवर आपले नाव बदलले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केआरकेने नुकतीच अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये केआरकेने त्याच्या ट्विटर हँडलवर नावातील बदलाची घोषणा केली आहे. त्याच्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले की, “आज मी माझ्या नावातून खान हटवून माझ्या नावासोबत माझ्या पत्नीचे आडनाव ‘कुमार’ जोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या पत्नीचे नाव अनिता कुमार आहे. तर आता माझे नाव कमाल रशीद कुमार आहे.

यासोबतच त्याने आपल्या ट्विटर हँडलवर आपले नाव बदलून कमाल रशीद कुमार असे केले आहे. केआरकेचे नाव बदलण्याचा हा निर्णय खूपच आश्चर्यकारक आहे. मात्र, त्याने या निर्णयामागचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. कमाल खान अनेकदा बॉलिवूड आणि त्यातील कलाकारांवर निशाणा साधताना दिसतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत