मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजीव निगम यांच्या नऊ वर्षीय मुलाचं निधन झालं. स्वतः राजीव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. काल ८ नोव्हेंबर रोजी राजीव यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला.
मुलाच्या मृत्यूने राजीव यांच्या घरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत राजीव निगम यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, ‘माझ्या वाढदिवसाला हे कसलं गिफ्ट तू मला दिलंस. आज माझा मुलगा देवराज आम्हाला सोडून गेला. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वीच तो गेला.’ राजीव निगम यांचा मुलगा देवराज अनेक वर्ष आजारी होता. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात राजीव निगम यांच्या वडिलांचं निधन झालं.
कॉमेडियन सुनील पाल यांनीही राजीव यांचा मुलगा देवराजच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. देवराज आणि राजीव यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘प्रिय मित्र राजीव निगम यांचा मुलगा देवराज जग सोडून गेल्याचे वृत्त ऐकून मी निशब्द झालो.’
View this post on Instagram