Children's Day and Pandit Jawaharlal Nehru's birth anniversary distribution of school materials
अहमदनगर महाराष्ट्र

बालदिन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त शालोपयोगी साहित्याचे वाटप, आव्हाड कुटुंबियांकडून आदर्श उपक्रम

संगमनेर, आश्वी : बालदिन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबलापुर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर शालोपयोगी स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना एकसमान व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी या साहित्याची मोठी मदत होईल. या उपक्रमातून आव्हाड कुटुंबियांकडून एक आदर्श ठेवण्यात आला आहे.

यावेळी शिबलापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिलावर इब्राहिम शेख, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोंद्रे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक शिवाजी विनायक आव्हाड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अशोक विनायक आव्हाड, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजी आनंदा नागरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ.यमुना ज्ञानदेव नागरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिता संजय म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सुखदेव नागरे, ज्ञानदेव गंगाराम नागरे, प्रगतशील शेतकरी भिमराज तबाजी सांगळे, सेवानिवृत्त प्राचार्य आनंदा भाऊराया गिते, संतोष मारुती गिते, निवृत्ती सुखदेव नागरे, प्रवीण ज्ञानदेव नागरे, सुभाष नामदेव नागरे, रमेश रघुनाथ मुन्तोडे, सुभाष भागवत मुन्तोडे, ज्ञानदेव गंगा नागरे, श्रीनिवास किसन नागरे, हौशीराम गंगा नागरे, पंढरीनाथ किसन नागरे, भैय्या दादा मिया शेख, भाऊसाहेब मैंदड , बाबासाहेब म्हस्के , संजय म्हस्के , हरिभाऊ वालझाडे , गंगाराम नागरे, गोरख दुर्गुडे, विशाल मुन्तोडे, नवनाथ नागरे, व तसेच ग्रामस्थ शिबलापूर उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत