Actress Shilpa Shetty's family infected with corona
कोरोना मनोरंजन

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. राज कुंद्रा, समिशा, वियान, तिची आई आणि सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा म्हणाली की आता सर्वजण बरे होत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने ही माहिती दिली आहे. तिने सांगितले कि, “एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी मागील 10 दिवस कठीण होते. माझ्या सासू-सासऱ्यांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिशा, वियान-राज, माझी आई आणि राज सर्वांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली. मार्गदर्शक सूचनांनुसार, ते सर्वजण त्यांच्या खोल्यांमध्ये विलगीकरणात आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहेत. आमच्या घरातील कर्मचार्‍यांपैकी दोन सदस्यांनीही कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. देवाच्या कृपेने, सर्वजण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. माझ्या चाचण्या नकारात्मक आल्या आहेत.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत