जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील तीन भाजपा नेत्यांच्या हत्येमागे पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी गुरुवारी दिली.
Terrorist group Lashkar-e-Taiba behind killing of three BJP leaders in Kulgam district of Jammu and Kashmir: Inspector General of Police Vijay Kumar
— Press Trust of India (@PTI_News) October 30, 2020
आयजी विजय कुमार म्हणाले की , ‘लष्कर’चा छुपा गट असलेल्या द रेजिस्टंस फ्रन्ट (टीआरएफ) या गटाने या हत्यांची जबाबदारी घेतली आहे. केंद्र सरकारने जेव्हापासून काश्मीरमधून कलम ३७० हटवले आहे तेव्हापासून या दहशतवादी संघटनेकडून भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांवर मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत सहा भाजपा नेत्यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर १६ भाजपा सदस्यांनी जाहीररित्या त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा त्याग केला होता. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकतेच बिगरकाश्मिरींना जमिनी विकत घेता येईल, हा नवा कायदा केंद्र सरकारनं मंजूर केला. त्यानंतर दोन दिवसांनी भाजपा नेत्यांवर हल्ला झाला होता.
दहशतवादी हल्ला : भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त