Woman Throws Daughter From 4th Floor
देश

आईने आपल्या चार वर्षांच्या मतिमंद मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले, चिमुकलीचा मृत्यू

बेंगळुरू : एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मतिमंद मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून देत तिची हत्या केली. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी महिला तिच्या मुलीसोबत बाल्कनीत फिरताना आणि नंतर तिला खाली फेकताना दिसत आहे. मुलीला खाली फेकल्यानंतर आरोपी सुषमा भारद्वाज हिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु शेजाऱ्यांनी तिला वाचवले. महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध तिचा पती किरणने तक्रार दाखल केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बेंगळुरूमधील संपंगीराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी ही घटना घडली. गुरुवारी संध्याकाळी, महिला मुलीला घेऊन घराबाहेर बाल्कनीत फिरत होती आणि यादरम्यान तिने मुलीला खाली फेकले. मुलगी जमिनीवर कोसळली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला एका रहिवाशाने उचलले आणि तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तिचा मृत्यू झाला.

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दाम्पत्याची चौकशी केली. मुलीचे वडील किरण यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुषमा हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथम तपासात असे दिसून आले की आई मुलीच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल खूश नव्हती आणि तिने गुन्हा केला.

पोलिसांनी सांगितले कि, आरोपी महिलेने काही महिन्यांपूर्वी मुलीला धावत्या ट्रेनमध्ये सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रकार किरण यांना समजला आणि त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन सदस्यांच्या मदतीने मुलीचा शोध घेऊन तिला घरी आणले. मात्र, त्यानंतर किरण यांनी सुषमाविरुद्ध तक्रार दाखल केली नव्हती. आरोपी महिला दंतचिकित्सक असून तिला वाटत होते की तिची मुलगी, जिला बोलताही येत नाही, ती तिच्या करिअरमधील प्रगतीमध्ये अडथळा आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत