minor girl rape
पुणे महाराष्ट्र

पुणे : 7 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या, आरोपीसह त्याच्या आईलाही अटक

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ येथे एका 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मावळ अप्रीसर येथील कोठारणे गावातील या चिमुकलीची बलात्कारानंतर आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी तेजस दळवी (वय 24) याला ताब्यात घेतले. तसेच आरोपीची आई सुजाता दळवी हिलाही पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लोक संतप्त झाले असून बलात्काराच्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. सोबतच खुनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी आणि निरागस पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी करत स्थानिक लोक आंदोलन करत आहेत.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत येथील 7 वर्षीय मुलगी ही 2 ऑगस्टपासून बेपत्ता होती. मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस तिचा शोध घेत होते. यादरम्यान, बुधवारी गावातील जिल्हा परिषद शाळेमागे मुलीचा मृतदेह आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला. शवविच्छेदनानंतर या 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी कसून चौकशी करत 24 तासांच्या आत आरोपी तेजस दळवी याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी याबाबत माहिती दिली. संशयावरून पोलिसांनी दळवीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तेजस दळवी हा मुलीच्या शेजारी राहत होता. आरोपीविरोधात पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 363, 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत