पुणे : वानवडी परिसरात पोलीसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी भागातील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्ता ह्या भागात वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विठ्ठल चोरमोले आणि अमोल गायकवाड गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) दुचाकीवरून […]
टॅग: Accused arrested
‘रक्षक’च ठरला भक्षक! सुरक्षारक्षकानेच फोडले घर, पुण्यातून लाखोंचे दागिने लंपास
पुणे : सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकानेच घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या सुरक्षारक्षकाला अटक करून त्याच्याकडून तब्बल आठ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव राकेशकुमार मुलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे आहे. तो सिंहगड […]
पुणे : ८ वर्षीय मुलाचे अपहरण, पोलिसांनी २ तासांत ट्रेनमधून केली मुलाची सुटका
पुणे : अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने दोन तासांत वाचवले. विशेष म्हणजे, कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीनेच या मुलाचे अपहरण केले होते. याप्रकरणी, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील गजानन पानपाटील (२५) या कथित अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी चिंचवड पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली की […]
स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाला महिना उलटूनही अद्याप आरोपपत्र दाखल नाही
पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. मात्र, घटनेला एक महिना उलटून गेला तरीही गाडे याच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही. तसेच गाडेची डीएनए चाचणी करण्यात आली, या चाचणीचा अहवाल […]
चेष्टा बेतली जीवावर! पुण्यातील 16 वर्षीय मुलाचा एअर कॉम्प्रेसर प्रँकमुळे मृत्यू, गुदद्वाराद्वारे अंगात हवा भरली आणि…
पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा एअर कॉम्प्रेसर प्रँकमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मुलाच्या गुदद्वाराला एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून त्याच्या अंगात हवा भरली. या अघोरी कृत्यामुळे अल्पवयीन मुलाचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा ते अकरा या दरम्यान हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट येथील पुना फ्लोअर […]
पुणे : 7 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या, आरोपीसह त्याच्या आईलाही अटक
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ येथे एका 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मावळ अप्रीसर येथील कोठारणे गावातील या चिमुकलीची बलात्कारानंतर आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी तेजस दळवी (वय 24) याला ताब्यात घेतले. तसेच आरोपीची आई सुजाता दळवी हिलाही पुरावे नष्ट करण्यात मदत […]
महाराष्ट्रातील नेत्यांना फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने या आरोपीला कोलकातामधून अटक केली आहे. याच आरोपीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना खासदार संयज राऊत यांनाही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएस यांना खात्रीलायक बातमी […]







