Police raid bust of sex racket
पुणे महाराष्ट्र

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका

पुणे : साळुंके विहार परिसरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने छापा टाकला. या प्रकरणातील पाच आरोपींवर कारवाई करत चार तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वानोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळुंके विहारच्या वरच्या भागात ‘गोल्डन टच स्पा’ नावाचे मसाज सेंटर आहे. या मसाज सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून माहिती गोळा केली. यावेळी पीडित तरुणी मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे उकळून वेश्या व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई करत स्पा मालक, स्पा सहकर्मचाऱ्यांसह डे मॅनेजरसह वानवरी पोलिसात PITA कायद्यान्वये कलम ३, ४, ५ आणि ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल आणि दोन महाराष्ट्रातील आहेत. सदर गुन्ह्यात रोख रकमेसह एकूण १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्पा मॅनेजर झरना उर्फ ​​पिंकी गौतम मंडल (वय 27, रा. कोंढवा, पुणे, मूळचा पश्चिम बंगाल) आणि मॅनेजर सुमित अनिल होनखंडे (वय 21, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी स्पा मालक रचना संताेष साळुंखे (रहिवासी येवलेवाडी, पुणे), सार्थक लोचन गिरमे (रहिवासी वानवडी, पुणे) आणि लोचन अनंता गिरमे (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत