Sushant Singh Rajput's sisters
मनोरंजन

सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींना होऊ शकते अटक, रिया चक्रवर्तीनं दाखल केली होती तक्रार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत रिया चक्रवर्ती हिनं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी या एफआयरची एक प्रत सीबीआयला पुढील तपास करण्यासाठी दिली असून, या एफआयरच्या आधारे सुशांतच्या बहिणींना सीबीआय अटक करू शकते. […]