रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक नवी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.
अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.