मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना […]
टॅग: arnab goswami
अर्णब गोस्वामी यांना मोठा झटका, रिपब्लिक वाहिनीवर यूके नियामकानं ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडला तब्बल २० लाख रुपये दंड ठोठावला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित करण्यात […]
अर्णब गोस्वामी यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी […]
‘या’ कारणामुळे सरकारने दाबले अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण
रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे ‘अर्णव गोस्वामी यांच्यासह भागीदार होते. गोस्वामी हे भाजपसाठी काम करतात म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारनं अन्वय नाईक यांचं आत्महत्या प्रकरण दाबलं,’ असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी […]
तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे, इतके ध्यानात राहू द्या, शिवसेना नेत्याचा अर्णब गोस्वामी यांना इशारा
मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी गोस्वामी यांची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकप्रकारे अर्णब यांना इशारा दिला आहे. अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सु्प्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर अर्णब यांनी तळोजा कारागृहाबाहेर जमलेल्या गर्दीपुढे वंदे मातरम, […]
अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामी यांच्यासह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याबेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे […]
राज्य सरकार व्यक्तिगतरित्या टार्गेट करत असेल तर.. सर्वोच्च न्यायालयाने दिला कडक इशारा
रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी सध्या जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विचारधारेतील मतभेदावरून टार्गेट केलं जात असल्याच्या मुद्यावर चिंता व्यक्त करत राज्य सरकारांना नागरिकांच्या स्वातंत्र्यावरून इशारा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान […]
अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या सूचना
रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली […]
अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी; माझा जीव धोक्यात आहे – अर्णव गोस्वामी
रायगड : अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. यावेळी अर्णव यांच्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. परिणामी अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले.भविष्यात […]
अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी.
अलिबाग : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. अर्णव गोस्वामी यांना न्याय नक्की मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला […]