Instructions given by the Governor to the Home Minister in the Arnav Goswami arrest case
महाराष्ट्र

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या सूचना

रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. राज्यपालांनी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गोस्वामी बुधवारी (४ नोव्हेंबर)पासून अटकेत आहेत. रविवारी त्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळं अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशा सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत