ST employee commits suicide

आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

महाराष्ट्र

जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मनोज अनिल चौधरी (वय ३०) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) आहे. माझ्या घरच्यांचा यात काही संबंध नाही. एसटी संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारास मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती’, असे नमूद केले आहे.

मनोज चौधरी हे राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत