Murder of a 13-day-old baby

धक्कादायक : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीत

महाराष्ट्र

सांगली : एका बालकाच्या हत्येनं संपूर्ण सांगली शहर हादरलं आहे. सांगलीतल्या भिलवडीतील पाटील मळा इथं अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याचा संशय आहे. पाण्याच्या टाकीत चिमुरड्याचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी घटनास्थळी शोध सुरू केला असता सिंटेक्स पाण्याच्या टाकीत टाकूनच 13 दिवसाच्या बाळाची हत्या करण्यात आली असावी असा संयश व्यक्त करण्यात येत आहे. अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी अधिक तपास करत असून अद्याप खुनाचं कारण समजू शकलेलं नाही. बाळाविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती गोळा करण्याचं काम पोलीस सध्या करत आहे.

पोलिसांच्या पथकाने टाकीतून बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बाळाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू झाला कसा याचा खुलासा होईल. यामुळे पुढील तपास करण्यास मदत होईल. दरम्यान, घडलेल्या प्रकाराविषयी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अधिक माहितीसाठी गावातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत