रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामी यांच्यासह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याबेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींविरुद्धची एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अंतरिम जामीनसाठी अर्णव गोस्वामींचा अर्ज नामंजूर करणं ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.