करोना विषाणूवरील लसीसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. करोना विषाणूची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनिती आखण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.
भारत करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांपैकी एक होईल. या लसीसंदर्भात एक रणनीती आखण्याची गरज आहे, जेणेकरून ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि सर्वांना ही लस सहजरित्या घेता येईल. तसेच ती परवडणारी हवी, आणि तिचे न्याय्य व योग्य वितरण याची खात्री करुन घेण्यासाठी केंद्र सरकारनं हे आताच करायला हवं, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.




