मिरज विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे विद्यमान आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना करोनाची लागण झाली आहे. सुरेश खाडे यांच्याबरोबर कुटुंबातील ८ सदस्यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली आहे. सुरेश खाडे यांच्यावर मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आमदार खाडे यांनी आपली प्रकृती उत्तम असून आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश दिला. तसेच कार्यकर्त्यांनी काळजी करुन नये मात्र सुरक्षेसाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
आमदार खाडे यांचे अंगरक्षक यांची करोना तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. अंगरक्षकाना काळजी म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आमदार खाडे यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा जणांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.




