Hathras gang-rape case
देश

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण : सीबीआयने तपास करून आरोपींविरोधात दाखल केलं चार्जशीट

उत्तर प्रदेश : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. सप्टेंबर महिन्यात हाथरसमध्ये ही संतापजनक घटना घडली होती. तीन महिन्यांनंतर सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी या प्रकरणाचा तपास करत चार आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केले. 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि नंतर तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हाथरसमद्ये १४ सप्टेंबरला या दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबरला घराजवळ रात्रीच्या अंधारात उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले होते. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यासोबतच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता.

सीबीआयने आपल्या आरोपपत्रात चौघांवर सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर खुनाचे आरोप लावले आहेत. तपासादरम्यान आरोपींच्या अनेक प्रकारच्या फॉरेन्सिक चाचण्या करण्यात आल्या. या व्यतिरिक्त सामूहिक बलात्कार पीडित महिलेवर उपचार घेत असलेल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील डॉक्टरांशीही संपर्क साधला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत