शारजा : सुपरनोव्हासने पहिल्यादा फलंदाजी करून 127 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेलॉसिटी संघाने १९.5 ओव्हरमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली आणि 5 विकेटने सामना जिंकला. व्हेलॉसिटीसाठी वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा आणि सुने लूस यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये संघाला विजयी सुरुवात करून दिली. सुषमाने 34, वेदाने 29 आणि सुने लूसने नाबाद 37 धावांचे योगदान दिले. व्हेलॉसिटीने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांच्या हल्ल्यासमोर सुपरनोव्हास चमारी अटापट्टू आणि हरमनप्रीत कौरने फटकेबाजीने समाधानकारक धावसंख्या गाठून दिली, पण ती विजयासाठी पुरेशी सिद्ध झाली नाही. दुसरीकडे, फलंदाजीत फेल झालेल्या सुपरनोव्हाससाठी गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. आयबोंगा खाकाने सर्वाधिक 2 तर शशिकला सिरिर्डेने आणि राधा यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
Match 1. It’s all over! Velocity won by 5 wickets https://t.co/G0GsolU9kE #SNOvVEL #JioWomensT20Challenge
— IndianPremierLeague (@IPL) November 4, 2020
लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीची सुरुवात खराब झाली आणि ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर डैनी व्याट एकही धाव न करता माघारी परतली. त्यानंतर शेफाली वर्मा देखील 17 धावांवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाली. कर्णधार मिताली राज काही खास कामगिरी करू शकली नाही आणि 7 धावा करून माघारी परतली. वेदा कृष्णमूर्ती एकाबाजूने लढा देत राहिली. वेदाने सुषमा वर्मासह डाव सांभाळला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. पण, वेदा राधा यादवच्या चेंडूवर 29 धावा करून झेलबाद झाली. सुषमाला मोक्याच्या क्षणी पूनम यादवने झेलबाद केले. सुषमाने 34 धावा केल्या. अखेरीस सुने लूस आणि शीखा पांडे यांनी संघाला विजय मिळवून दिला.
What a thriller we’ve witnessed here in Sharjah! ?#Velocity pull off a 5-wicket over #Supernovas in the opening encounter of #JioWomensT20Challenge ???#SNOvVEL pic.twitter.com/jTB9yVgM1y
— IndianPremierLeague (@IPL) November 4, 2020