Raghuvansh Prasad Singh

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन

देश राजकारण

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलचा(RJD) राजीनामा दिला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रघुवंश प्रसाद सिंह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिंह यांना आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज (१३ सप्टेंबर) त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

रघुवंश प्रसाद यांच्या निधनाचं वृत्त समजताच बिहारमध्ये राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केलं जात आहे. रघुवंश प्रसाद मागील ३२ वर्षांपासून राजदमध्ये होते. बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच त्यांनी आयसीयूतून पक्षाचा राजीनामा दिला होता. रघुवंश प्रसाद यांचं राजदमध्ये चांगलं वजन होतं. लालू प्रसाद यादव हे सुद्धा रघुवंश यांनी दिलेले सल्ले ऐकायचे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत