मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून . यावेळी त्यांनी कोरोना, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.
रेस्टॉरंट आणि मंदिरे टप्प्याटप्प्याने लवकरच सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले होते. येत्या तीन-चार दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच जिम-रेस्टॉरंट मालकांनी सूचना पाळाव्या, आपण सुरु करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई लोकल इतक्यात पुन्हा सुरु होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यावर, “कोरोनाच्या संकटात आंदोलन करु नका, तुम्हाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध, गैरसमज पसरवू नका, एकजुटीने न्याय मिळवून देऊ”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलं.
शेतीमध्ये क्रांती करायची आहे. महाराष्ट्राची ‘प्रयोगशील राज्य’ ही ओळख आहे. आजपर्यंत जे ‘पिकेल ते विकेल’ होतं, परंतु आता जे ‘विकेल ते पिकेल’ योजना आणत आहोत. हमी भाव नाही, आता हमखास भाव! , असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. कुठेही उणीव न ठेवता सर्व आघाड्यांवर सरकार कार्यरत आहे. शेतकर्यांच्या पाठीशी अधिक उभे आहोत कारण शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्तांना 18 कोटींची मदत देण्याची घोषणा केली. विक्रमी कापूस उत्पादन झाले त्याची खरेदी केलेली आहे, महाराष्ट्रातील कुपोषित साडे सहा लाख बालकांना मोफत दुधभुकटी वाटप केले आहे, सव्वा लाख स्तनदा मातांना पण ही भुकटी मोफत देत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात आहे. त्याविषयी मी बोलेन पण आता नाही, वेळ आल्यावर मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन पण माझं अधिक लक्ष कोरोनावरच असणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.





महाराष्ट्रात कोरोना मुळे खूप मोठे संकट आले आहे । मा. उद्धव ठाकरे यांनी जिम चालू करण्यास परवानगी द्यावी नाही तर जिम चालकांवर उपासमारीची वेळ येईल
कांहीं वर तर खर्च भागवणे ही अवघड झाले आहे । जिम तस सगळी कडे पोलिस सेटलमेंट करून चालू आहे पण ज्यांची ओळख नाही त्यांची जिम बंद आहे