IPL 2020
क्रीडा

आयपीएलमध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चाहत्यांच्या रेकॉर्डेड प्रतिक्रिया दाखवणार

बीसीसीआयने युएईत यंदाच्या हंगामाच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन केलं आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. युएईत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चाहत्यांच्या रेकॉर्डेड प्रतिक्रिया, टाळ्या, शिट्ट्या यांचं आयोजन करण्यात येणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काही संघमालकांनी चिअरलिडर्सच्या फोर आणि सिक्स गेल्यानंतरच्या रेकॉर्डेड डान्स मूव्ह मैदानावर चालवण्याचं ठरवलंय. तसेच काही संघांनी चाहत्यांच्या प्रतिक्रिया, टाळ्या आणि शिट्ट्या रेकॉर्ड करुन मैदानात लावण्याचं ठरवलंय. यामुळे खेळाडूंना आपले चाहते आपल्यासोबत आहेत व ते आपला खेळ पाहत आहेत असं वाटेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत