हैदराबाद : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत तेलंगणातील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ते खाली पडले होते आणि त्यांना दुखापत झाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत सहभागी झाले […]
टॅग: Hyderabad
ऑनर किलिंग! आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे पत्नीच्या कुटुंबीयांनी केली तरुणाची निर्घृण हत्या
हैदराबाद : आंतरधर्मीय विवाह केलेल्या २५ वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी कथितरित्या हत्या केली. बिल्लापुरम नागराज हे आपली पत्नी अश्रीन सुलतानासोबत बुधवारी रात्री मोटारसायकलवरून जात होते, त्यावेळी त्यांच्यावर सरूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीएचएमसी कार्यालयाजवळ चार-पाच जणांनी हल्ला केला. नागराज यांच्यावर हल्लेखोरांनी चाकूने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावात राहणारा […]
6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मंत्री म्हणाले की आरोपीला पकडून एन्काउंटर करणार…
हैदराबाद : तेलंगणामधील हैदराबादमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे लोक संतापलेले आहेत. प्रत्येकजण आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारच्या मंत्र्याने म्हटले आहे की आम्ही त्याला लवकरच शोधून काढू आणि त्याचे एन्काउंटर करू. तेलंगणा सरकारमधील कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबाद प्रकरणाबाबत लवकरात लवकर […]
सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने पिठानी याला ड्रग्स प्रकरणात हैदराबादमधून अटक केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने यापूर्वी सिद्धार्थ पिठानी याची अनेक वेळा चौकशी केली होती. सीबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये त्याची सलग अनेक दिवस चौकशी केली होती. ड्रग्स प्रकरणात यापूर्वीही बर्याच लोकांना […]
IPL डबल हेडर : आज दुपारी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना, तर रात्री कोलकाता आणि चेन्नई यांच्यात सामना
IPL 2021 : आयपीएलच्या १४व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडर मध्ये पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी ३.३० वाजता तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता होणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या लढतीमधील पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यापैकी पंजाबचा […]
हैदराबादमधील गौलीपुरा येथे शाळेत भीषण आग, ५० विद्यार्थ्यांची सुटका
हैदराबाद : जुन्या शहरातील मुगल पुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौलीपुरा येथे श्रीनिवास हायस्कूलच्या दुमजली इमारतीत गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुमारे 50 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. वृत्तानुसार, शॉर्ट सर्किटमुळे तळमजल्यावर असलेल्या शाळेच्या प्रशासकीय कार्यालयात ही आग लागली. यात शाळेच्या नोंदी, पुस्तके व फर्निचर जाळून खाक झाले. […]
पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]
तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं, पत्नीसह सहा जणांना अटक
सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळण्यात आले. हैदराबादच्या जगतियाल गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पत्नीसह सहा ते सात जणांना अटक करण्यात आली आहे. काळी जादू केल्याच्या संशयावरुन आणि मेहुण्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या संशयावरून तरुणाला जाळून ठार मारण्यात आले. तेलंगणातील जागतियालमधील बलवंतपूर गावात सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पवन कुमार असे मृत […]
IPL 2020 : मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा १० विकेट राखून दणदणीत विजय
सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच दहा विकेट राखून जिंकली आणि दिमाखात प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला. प्ले ऑफ फेरीची पहिली मॅच ५ नोव्हेंबर रोजी आहे. ही मॅच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईत रंगणार आहे. तर दुसरी मॅच ६ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबुधाबीत होणार आहे. Match 56. […]
IPL 2020 डबल हेडर : आज मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३.30 वाजता मैच, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात ७.30 वाजता मैच
आयपीएलच्या आजच्या डबल हेडरमध्ये (एका दिवसात 2 सामने), 4 संघांपैकी दोन संघांना प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी ३.30 वाजता दुबई येथे सामना रंगेल. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शारजाह येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. […]