man tied to a chair and burnt alive

तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं, पत्नीसह सहा जणांना अटक

देश

सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळण्यात आले. हैदराबादच्या जगतियाल गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पत्नीसह सहा ते सात जणांना अटक करण्यात आली आहे. काळी जादू केल्याच्या संशयावरुन आणि मेहुण्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या संशयावरून तरुणाला जाळून ठार मारण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तेलंगणातील जागतियालमधील बलवंतपूर गावात सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पवन कुमार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पवनची (४०) पत्नी कृष्णवेनीला सुद्धा अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कुमार जादूटोणा करत असल्याचा संशय त्यांना होता. त्याची पत्नी कृष्णवेनीचा भाऊ जगन याचा १२ दिवसांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला पवन कारणीभूत असल्याचा संशय त्यांना होता. जादूटोणा करून पवन आपल्याला इजा पोहोचवणार असल्याचा संशय जगनच्या पत्नीला होता. जगनच्या मृत्यूनंतर त्याची पवननेच हत्या केल्याचा संशय तिने व्यक्त केला होता.

कृष्णवेनीने पोलिसांना सांगितले की, वहिनीने तिच्या नवऱ्याला जाळून मारले. घरातून धूर येत असल्याचे दिसले. तसेच पवनच्या किंचाळ्या ऐकू आल्या. तिने तातडीने धाव घेतली आणि घराचा दरवाजा उघडला. मात्र, धुराचे लोट येत असल्याने घरात प्रवेश करू शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पवनचा मृतदेह विच्छेदनासाठी जोगतियाल येथील रुग्णालयात नेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पवनची पत्नी आणि सासरकडील सहा जणांना अटक केली असून चौकशी सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत