सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच दहा विकेट राखून जिंकली आणि दिमाखात प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला. प्ले ऑफ फेरीची पहिली मॅच ५ नोव्हेंबर रोजी आहे. ही मॅच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईत रंगणार आहे. तर दुसरी मॅच ६ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबुधाबीत होणार आहे.
Match 56. It’s all over! Sunrisers Hyderabad won by 10 wickets https://t.co/zV58wrXXuf #SRHvMI #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 3, 2020
आयपीएलच्या ५६व्या आणि शेवटच्या लीग मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने २० ओव्हरमध्ये ८ बाद १४९ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादने १७.१ ओव्हरमध्ये १५१ धावा करुन मॅच दहा विकेट राखून जिंकली. या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नरने नाबाद ८५ तर वृद्धिमान साहाने नाबाद ५८ धावा केल्या.
याआधी मुंबई इंडियन्सकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक ४१ धावा केल्या. रोहित शर्मा ४ धावा, क्विंटन डी कॉक २५ धावा, सूर्यकुमार यादव ३६ धावा, इशान किशन ३३ धावा, कृणाल पांड्या शून्य धावा, सौरभ तिवारी १ धाव, नॅथन कुल्टर नाइल १ धाव, जेम्स पॅटिसन नाबाद ४ धावा, धवल कुलकर्णी नाबाद ३ धावा करू शकले. संदीप शर्माने रोहित शर्मा, डी कॉक आणि इशान किशन या तिघांना बाद केले. शाहबाझ नदीमने सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्याला बाद केले. जेसन होल्डरने पोलार्ड आणि नॅथन कल्टर नीलला बाद केले. राशिद खानने सौरभ तिवारीला बाद केले.