corona dead in naded

नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती भीषण, सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

कोरोना नांदेड महाराष्ट्र

नांदेड : राज्यात कोरोनाने रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागले आहेत. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे. सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. नांदेडमधली गोवर्धन घाट स्मशानभूमीत दिवसभरात 17 अत्यंविधीची नोंदणी झालीय. काल याच स्मशानभूमीत 20 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती किती बिकट आहे याची कल्पना येते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नांदेडमध्ये ९७० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली तर १४ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. नांदेड जिल्ह्यात ८ हजार ७१५ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. ९३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात ६९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत