Supreme Court notice to Facebook and WhatsApp
देश

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. आता चार आठवड्यांनंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, लोकांना शंका आहे की त्यांची गोपनीयता धोक्यात आहे आणि त्यांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. त्याचवेळी कोर्टाने सांगितले की आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी  यापेक्षा अधिक मौल्यवान आहे.

या याचिकेत म्हटले आहे की व्हॉट्सअॅपने युरोप आणि भारतासाठी वेगवेगळे मापदंड अवलंबले आहेत. यासंदर्भात व्हॉट्सअॅपने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे की, “युरोपचा प्रायव्हसी बाबत खास कायदा आहे, जर भारतात देखील असाच कायदा असेल तर आम्ही त्याचे पालन करू.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत