Re-rape by a police officer on a gang rape victim

संतापजनक : सामुहिक बलात्काराची तक्रार घेऊन गेलेल्या पीडितेवर पोलीस अधिकाऱ्याकडून पुन्हा बलात्कार

देश

उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. सामुहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेवर तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जलालाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदनपूर गावात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने गुरुवारी पत्रकारांना सांगितलं की, ३० नोव्हेंबर रोजी ती आपल्या घरी पायी निघाली होती. यावेळी एक कार तिच्याजवळ येऊन थांबली त्यानंतर यातील पाच जणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि नंतर ओढत जवळच्या शेतात नेऊन सामुहिक बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने जलालाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडित महिला पोलीस ठाण्यात गेली तेव्हा तिथे एक पोलीस उपनिरिक्षक उपस्थित होता त्याने तिला त्याच्या खोलीत नेले आणि तिथे बलात्कार केला. यानंतर पीडितेची तक्रारही नोंदवली गेली नाही. त्यामुळे तीने बरेलीचे सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची बुधवारी भेट घेतली. त्यानंतर अविनाश चंद्रा यांनी महिलेच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत