In the UK, corona vaccination has worsened the condition of the two

ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडली, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ निर्देश

ग्लोबल

ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येत आहे. दरम्यान कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लसीचे साइड इफेक्ट झालेल्या दोन्ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहेत. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सांगितले की, या लसीमुळे झालेले दुष्परिणाम एलर्जीमुळे झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यानंतर ब्रिटनच्या आरोग्य विभागाने निर्देश दिले कि, ज्या नागरिकांना, लस, औषध अथवा इतर प्रकारची एलर्जी असेल त्यांनी   फायजरची लस घेऊ नये. लसीकरण सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये ही सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे एलर्जी असलेल्या नागरिकांना आता लस देण्यात येणार नाही. लस टोचल्यामुळे दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली होती. आता मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काळजी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही आरोग्य कर्मचाऱ्यांना Anaphylactoid Reactions झाली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत