गुजरातचे सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार आणि पाटण लोकसभेचे भाजपचे माजी खासदार महेश कनोडिया यांचे आज (रविवारी) निधन झाले. कनोडिया बर्याच दिवसांपासून आजारी होते. दीर्घ आजारानंतर गांधीनगरात त्यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
दीर्घ आजारानंतर संगीतकार महेश कनोडिया यांनी गांधीनगर येथील निवासस्थानी आज अखेरचा श्वास घेतला. महेश कानोदिया स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही स्वरांमध्ये गाऊ शकत होते. महेश लताजी, रफी साहब इत्यादी 32 कलाकारांच्या आवाजात गाणी गाण्यासाठी देखील प्रसिद्ध होते. महेश हे बर्याच काळासाठी पाटण लोकसभेचे खासदारही होते.
महेश कनोडिया जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। वे एक बहुमुखी प्रतिभासंपन्न गायक थे, जिन्हें लोगों का भरपूर प्यार मिला। एक राजनेता के रूप में भी वे गरीबों और पिछड़ों के सशक्तिकरण के लिए समर्पित रहे। हितु कनोडिया जी से मैंने बात की और उनके परिजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की।
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2020
महेश हे 80 च्या दशकात गुजराती फिल्म इंडस्ट्रीचे पहिले गुजराती स्टार आहेत, ज्यांनी भारताबाहेर आपली प्रतिभा दाखविली. आफ्रिका, अमेरिका आणि आशिया खंडातील काही देशांच्या मंचांवर त्यांनी कामगिरी बजावली.




