अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं होत, त्यावेळी ही घटना घडली. व्हिडिओत दिसत आहे कि, राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा पायऱ्या चढताना २-३ वेळा तोल गेला. नंतर ते बाजूच्या रेलिंगचा आधार घेत हळूहळू पायऱ्या चढून वरती पोहोचले आणि नंतर त्यांनी मागे वळून सॅल्यूट केला. दरम्यान, यावेळी इथे जोरदार वारा देखील होता.
President Joe Biden twice lost his footing while climbing up the steps to Air Force One https://t.co/8zaZ7etqxr pic.twitter.com/N5K5J0OdLK
— Reuters (@Reuters) March 19, 2021




