इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या संसदेने विवाहापूर्वी लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. म्हणजेच आता इंडोनेशियामध्ये लग्नाआधी कोणाशी शारीरिक संबंध ठेवणे बेकायदेशीर आणि गुन्हा मानला जाईल. या नव्या कायद्यानुसार केवळ पती-पत्नीच शारीरिक संबंध ठेवू शकतात. दुसरीकडे, एखाद्या विवाहित जोडप्याने आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवले तर ते देखील गुन्ह्याच्या कक्षेत येईल.
कारवाई कधी होणार?
पहिल्या स्थितीत पालकांनी मुलांविरुद्ध तक्रार केल्यावर अविवाहितांवर कारवाई केली जाईल. दुसरीकडे, विवाहित जोडप्याच्या बाबतीत, जेव्हा एखादी महिला किंवा पुरुष त्यांच्या जोडीदारावर गुन्हा दाखल करेल तेव्हा कारवाई केली जाईल.
कायद्यानुसार, न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वी तक्रार मागेही घेता येते, परंतु खटला सुरू झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक वर्ष तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो.
यापूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे कायद्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही
इंडोनेशियामध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी सरकारने हा कायदा लागू करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र हजारो लोक रस्त्यावर उतरून याला विरोध करत होते. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य पाहून सरकारने आपली पावले मागे घेतली होती.