Another body was found at the spot where Mansukh Hiren's body was found
ठाणे महाराष्ट्र

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथेच आढळला आणखी एक मृतदेह

ठाणे : मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह सापडला. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मृतदेहाची ओळख पटलेली असून शेख सलीम अब्दुल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल सलीम मजूर असून मुंब्रा, रेतींबदर येथे वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस अधिकारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली की ही हत्या आहे, घातपात की अपघात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, ही व्यक्ती शौचास गेली असावी आणि पाय घसरून खाडीत पडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत