नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियूष चावला याच्या वडिलांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले. पियूष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, कोरोनामुळे गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांना वाचवण्यात यश आले नाही आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
पियूष चावलाने त्याच्या वडिलांचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या निधनाबद्दल सांगितले. तो म्हणाला कि, “त्यांच्याशिवाय आयुष्य आता तसेच राहणार नाही. आज माझा आधारस्तंभ गमावला.” त्याने पोस्टमध्ये लिहिले की सांगण्यास अतिशय वाईट वाटत आहे की माझे वडील प्रमोद कुमार चावला यांचं आज निधन झालं. त्यांना कोरोना झाला होता आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी.
View this post on Instagram




