Health benefits of eating raw mango

कैरी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

उन्हाळ्याच्या मौसमात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात येणारा आंबा सर्वांनाच आवडतो, पण पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. उन्हाळ्यातील हे मुख्य फळ आहे. कैरीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. कैरीमध्ये जीवनसत्त्व -ए, सी आणि ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखी पोषक द्रव्ये आढळतात. चला तर मग आज आपण कैरीच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया..

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कैरी खाण्याचे फायदे :

 1. आम्लपित्त प्रतिबंधित करते आणि अन्नपचनास मदत :
  उन्हाळ्यात बर्‍याचदा मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर आम्लपित्त (ऍसिडिटी) होते. ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर काळ्या मिठाबरोबर कैरी खाल्ल्याने आराम मिळतो. अन्न सहज पचले जाते आणि पोटात गॅस होत नाही. कैरी शरीराला आवश्यक पाण्याच्या पुरवठ्यात मदत करते, जे आपल्याला पचनसाठी आवश्यक असते.
 2. उष्माघातापासून बचाव :
  उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मिठासह कैरीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय उन्हाळ्यात शरीरातील पाण्याच्या पुरवठ्यासाठी कच्चा आंबा देखील वापरला जाऊ शकतो.
 3. वजन कमी करण्यास मदत :
  कैरी खाल्ल्यास वजनही कमी होऊ शकते. जर तुमचे पोट वाढत असेल तर कैऱ्या खाण्यास सुरुवात करा. काही दिवसानंतर शरीरात बदल दिसून येतील. आपल्याला आहार पचण्यास त्रास होत असेल तर कैरी खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
 4. हाडे मजबूत करते :
  कॅल्शियम शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. कैरीमध्ये कॅल्शियम देखील असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
 5. त्वचा उजळते :
  कैरी खाल्ल्याने तुमच्या त्वचेवरचे डाग दूर होतात. याव्यतिरिक्त, कैरी आपले केस देखील काळे करते. कैरीचे नियमित सेवन केल्यास त्वचा सुधारण्यास खूप मदत होते.
 6. रक्तदाबावर नियंत्रण :
  कैरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
 7. साखरेची पातळी कमी करण्यास मदत :
  कैरीच्या सेवनाने शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच लोहाची कमतरता देखील दूर करते. जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण आपल्या आहारात कैरी समाविष्ट करू शकता. काळ्या मिठाबरोबर कैरी खाल्ल्यास हे फायदेशीर ठरते.
 8. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते :
  कैरीत व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. फक्त हेच नाही तर ही तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. कोरोना काळात आणि उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी कैरी खाणे हा चांगला पर्याय आहे.

याशिवाय कैरीच्या सालीत असणारे पेक्टिन जुलाब, अतिसार, मूळव्याध, पेचिश, बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटी यासारख्या सामान्य पोटाच्या समस्यांच्या उपचारांमध्ये मदत करते.

एका दिवसात किती कैरी खायला हवी?
एक निरोगी व्यक्ती दररोज 100 ते 150 ग्रॅम कैरी खाऊ शकतो. तर मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले रूग्ण दररोज 10 ग्रॅम कैरीचे सेवन करू शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत