Shiv Sena Nashik Corporator Satyabhama Laxman Gadekar

शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

कोरोना नाशिक महाराष्ट्र राजकारण

नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यभामा गाडेकर कोरोना काळातही जनतेसाठी सतत काम करत होत्या. त्यांनी नाशिक महापालिकेत नगरसेवकपद भूषवले आहे तसेच त्या नाशिक महापालिका स्थायी समितीच्याही त्या सदस्या होत्या. त्या नाशिक प्रभाग क्रमांक ’22 ब’ चे प्रतिनिधित्व करत होत्या.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले कि, “नाशिक शहरातील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे दुःखद निधन झाले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असलेल्या सत्यभामा गाडेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये विविध महत्वाची पदे भूषविली. त्या अतिशय लढवय्या नेत्या होत्या. त्या नागरिकांच्या प्रश्नांवर अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत असायच्या.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत