Hugging a special person has amazing health benefits
तब्येत पाणी ब्लॉग

जादू की झप्पी… मिठी मारल्याने आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या..

आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनापेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? शब्दांद्वारे सांगता येत नाही अशा भावना एक मिठी सांगू शकते. आपल्या जोडीदाराला मारलेली मिठी अनेक अबोल अशा भावनांना वाट करून देते. आपल्या जोडीदारासह आपण आपल्या आईवडिलांना, भावाला, बहिणीला, मित्रांनाही प्रेमळ मिठी देऊ शकता, कारण एखाद्याला मिठी मारणे ही एक सुंदर भावना आहे. पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट माहितेय? एक मिठी आरोग्यासाठी देखील खूप फायद्याची असते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संशोधकांनी मिठी मारण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी एक संशोधन केले. 400 हून अधिक लोकांवर केलेल्या या अभ्यासात संशोधकांना खूपच आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या. आपल्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने आपल्या आरोग्यावर त्याचे खूप चांगले परिणाम होतात.

  1. मिठी मारल्याने शरीरातील लव हार्मोन ऑक्सीटोसिनची पातळी वाढते. हे हार्मोन हृदय निरोगी राहण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
  2. मिठी मारल्याने रक्तदाब देखील कमी होतो. हे शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन स्रवल्यामुळे होतं. अभ्यासात समोर आलं आहे की, ज्या व्यक्ती नेहमी आपल्या जोडीदाराला मिठी मारतात, त्यांचा रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो.
  3. बर्‍याच अभ्यासांमध्ये स्पष्ट झाले आहे की एखाद्या खास व्यक्तीला मिठी मारल्याने तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते.
  4. मिठी मारल्याने स्मरणशक्ती तीव्र होते.
  5. मिठी मारल्याने व्यक्तीची मनःस्थिती चांगली होते, असे संशोधकांचे मत आहे. जेव्हा आपण एखाद्यास मिठी मारता, तेव्हा आपल्या मेंदूत जास्त प्रमाणात सेरोटोनिन संप्रेरक तयार होते, ज्यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहते. मूड फ्रेश राहतो.
  6. मिठी मारल्याने व्यक्तीची कार्यक्षमता वाढते.
  7. मिठी मारल्याने आजारी पडण्याची शक्यता कमी होते. ज्यांना नेहमी जोडीदाराची साथ मिळते, त्या व्यक्ती कमी आजारी पडतात.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत