Cigarette smoking is very harmful to health
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

सिगारेटमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नवीन अभ्यासात समोर आले धक्कादायक निष्कर्ष

सिगारेट पिणे आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते. याबाबत अनेकजण बोलत असतात. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते, फुफ्फुसांचे आजार उद्भवतात. फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची देखील शक्यता असते, हे बहुतेक सर्वांना माहित आहे. परंतु, सिगारेट पिण्याचे अनेक बरेच तोटे शरीराला सहन करावे लागतात. अनेकजण टेन्शन आलं की सिगारेट पितात. पण ते शरीरावर एकप्रकारे अन्यायच करत असतात. सिगारेटमुळे संपूर्ण शरीर आतून कसे पोकळ होते ते जाणून घेऊया.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  1. सिगारेटमध्ये असणाऱ्या निकोटीनचा तुमच्या मज्जासंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. सिगारेट पिल्यावर आपल्याला काही काळासाठी खूप सक्रिय वाटते. परंतु त्याचा परिणाम संपताच आपल्याला थकवा जाणवेल आणि पुन्हा एकदा सिगारेट पिण्याची इच्छा होते. जर निकोटीनचे व्यसन लागले तर तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय सोडण्यात खूप अडचणी येतात.
  2. सिगारेटमुळे आपली संपूर्ण हृदययंत्रणा व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आपण धोक्यात आणतो. निकोटीनमुळे रक्तवाहिन्या खूप कडक होतात, ज्यामुळे रक्त प्रवाहात अडचण येते. हळूहळू यामुळे धमन्यांचे रोग होतात. धूम्रपान केल्यामुळे रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि रक्त घट्ट होण्यास सुरवात होते. या सर्व गोष्टींमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
  3. धूम्रपान करण्याचा परिणाम आपल्या त्वचेमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. नुकत्याच एका अभ्यासात समोर आलेल्या निष्कर्षानुसार, धूम्रपान केल्याने त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान केल्याने नखांमध्ये बुरशीजन्य इन्फेक्शन होतात. तसेच केस वेगाने गळणे आणि पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात.
  4. सिगारेट पिण्याच्या सवयीमुळे तोंड, घसा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान करणारे बहुतेक लोक स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा बळी ठरतात.
  5. सिगारेटचा इन्सुलिनवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो आणि त्याच्याशी संबंधित जोखीम वाढण्याची शक्यता असते.
  6. निकोटीन पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक अवयवावर देखील परिणाम करते. यामुळे पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता कमी होते, तर महिलांमध्ये लैंगिक इच्छांचा अभाव दिसून येतो. निकोटीनमुळे सेक्स हार्मोन्सची पातळी कमी होते. याचे गंभीर परिणाम सेक्स लाईफवर होतात.
  7. सिगारेट पिताना आपण अशा घटकांना शरीरात प्रवेश देता, ज्यामुळे आपल्या फुफ्फुसांना नुकसान होते. दररोज सिगारेटचे सेवन केल्याने हे नुकसान वाढतच जाते आणि यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू लागतात. सिगरेट पिणाऱ्यांना एम्फेसिमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटीस, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिसिज (COPD) आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

आपण हे मान्य करूयात की, सिगारेटचे व्यसन सोडणे खूप कठीण काम आहे. परंतु डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि त्यासाठी योग्य योजना आखून तुम्ही त्यावर काम करू शकता. अशी अनेक नॉन-प्रिस्क्रिप्शन आणि प्रिस्क्रिप्शन औषधे आहेत, जी सिगारेट सोडण्यास मदत करतात. सिगारेट सोडण्यासाठी आपण एखाद्या केंद्राची देखील मदत घेऊ शकता. याला एक संधी किंवा चॅलेंज म्हणून स्वीकारा. सिगारेट सोडल्यास तुमची संपूर्ण शरीर प्रणाली हळूहळू सुधारत जाते आणि तुम्ही पुन्हा निरोगी जीवनाकडे वाटचाल करण्यास सुरवात करता. आपण आपल्या शरीरासाठी आणि आपल्या प्रियजणांसाठी एवढं करूच शकतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत