back pain in work from home
कोरोना तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

कोरोनाशी लढताना आणि कोरोनाबरोबर जगताना काय काळजी घ्याल? – डॉ. उमेश फालक

पुणे : आपण सर्वजण आता कोरोनाबरोबर जगण्याची सवय लावून घेत आहोत. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी ते महत्वाचं झालेलं आहे. अशा वेळी आपण नक्की काय करावं? दैनंदिन जीवनात काय बदल करावेत? स्वतःला कोणत्या सवयी लावून घ्यायला हव्या? काय काळजी घ्यावी? अशा काही प्रश्नांची उत्तरं आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. याविषयी आपल्याला फिजिओथेरपिस्ट डॉक्टर उमेश फालक आणि न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर केतकी फालक यांनी मार्गदर्शन केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आपले शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, पोषक आहार आणि शांत झोप या गोष्टी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. आपण हल्ली बऱ्याच ठिकाणी वाचतो, ऐकतो की आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवायला हवी. ती कशी वाढवायची? परंतु, त्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपली प्रतिकारशक्ती ही एका रात्रीतून किंवा दोन-चार दिवस गोळ्या घेऊन वाढत नाही. ती वाढवण्यासाठी नियमित पोषक आहार घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षित आहारतज्ज्ञांकडून सल्ला घेऊन आपण संतुलित आहार घेऊ शकतो.

कोरोनाशी लढताना आणि कोरोनाबरोबर जगताना आपण स्वत:साठी एक नियमावली बनवायला हवी. जसे की- शारीरिक स्वच्छता राखणे, दररोज व्यायाम करणे, कामाची व विश्रांतीची वेळ ठरवणे, सात्त्विक आहार योग्य प्रमाणात व वेळेत घेणे, मद्यपान, तंबाखूचे सेवन टाळणे, परिवारासोबत वेळ घालवणे, दुसऱ्यांना मदत करणे इ.

सद्य परिस्थिती पाहता बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत. त्यामुळे आज आपण काम सांभाळून शारीरिक स्वास्थ्य कसे जपता येईल हे पाहू. त्यासाठी स्वतःला काही सवयी लावून घ्या.

स्नायूंचे व हाडांचे आजार टाळण्यासाठी हे करा :

  1. सर्वप्रथम आपण काम करताना आरामदायक बसलो आहोत ना ते पहा.
  2. दर ३०-४० मिनिटांनंतर थोडे चला. सतत एका जागी बसणे टाळा.
  3. कामासाठी लागणारे सर्व साहित्य जवळ ठेवा. त्यासाठी वाकणे टाळा.
  4. मानेतून किंवा पाठीतून न वाकता शक्यतो पाठीचा कणा सरळ ठेवा.
  5. अधूनमधून शरीराला Stretching द्या (दोन्ही हात सरळ वर करून मागच्या बाजूला ताण द्या.)
  6. काम करताना बसण्यासाठी योग्य उंचीच्या टेबल खुर्चीचा वापर करा.
  7. भरपूर पाणी प्या.

शारीरिक व्यायाम व मानसिक स्वास्थ्य :

व्यायामामुळे शारीरिक व मानसिक ताण कमी होतो. शारीरिक व्यायामाचा आपल्या मानसिकतेवर खोलवर परिणाम होतो. उदासिनता, चिडचिडेपणा कमी होतो, शांत झोप लागते, आकलनक्षमता देखील वाढते आणि एकंदरीत आपण दिवसभर आनंदी राहतो, असे अनेक फायदे व्यायामामुळे होतात.

आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा कधी-कधी काही स्नायूंमध्ये ताण जाणवतो. (प्रामुख्याने चेहरा, मान व खांद्यातील स्नायू) कधी डोकं दुखतं, कधी छातीत जडपणा वाटतो, पोट दुखतं, झोप लागत नाही इ. या ताणतणावातून बाहेर कसं पडायचं? तर त्याचं उत्तर आहे व्यायाम. एक नैसर्गिक उपचार. कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करणे हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगले. तेव्हा आपण दिवसभर ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे.

आता व्यायाम करायचा तर किती वेळ? आणि कोणता? तर WHO ने सांगितल्याप्रमाणे आठवड्यातील किमान ५ दिवस ३०-४५ मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करावा. त्यात चालणे, पळणे, जॉगिंग करणे, थोडे वॉर्म-अप एक्सरसाइज करणे, बॉडी स्ट्रेचिंग, प्राणायाम, योगासने ह्यांचा समावेश होतो. परंतु जर व्यायाम करताना एखादा अवयव दुखत असेल किंवा आपण चुकीच्या पद्धतीने करत आहोत असे वाटत असेल किंवा आपले वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा इतर कोणतीही शंका असल्यास आपल्या फिजिओथेरपिस्टला भेटणे व त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पाठदुखीबाबत थोडेसे जाणून घेऊया :

प्रत्येकाची पाठ आयुष्यात केव्हा ना केव्हा दुखतेच. कारण काहीही असो; पण या दुखण्यासाठी प्रत्येकाला दवाखान्याची पायरी कधी ना कधी चढावीच लागते. हे दुखणं येतंही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. कधी ती पाठीत भरलेली लचक असते, तर कधी अंथरुणावर खिळवून ठेवणारी. अर्थात प्रत्येक प्रकारच्या पाठदुखीचे उपचारही वेगवेगळेच असतात.

पाठदुखी हा खरंतर वेगवेगळ्या आजारांचा समूह आहे. त्याचे पहिले लक्षण असते पाठदुखी! साधारणपणे पाठीत दुखणे, पाठीत आणि पायात दुखणे, पायात कळ येणे, पायात मुंग्या येणे, कुल्यात दुखणे असे याचे स्वरूप असते. कधीकधी रुग्ण पायातील ताकद जाणे किंवा कमी होणे अशा लक्षणांमुळे दवाखान्यात येतात. अशा या पाठदुखीची कारणे मात्र नानाविध आहेत.
अपुऱ्या आणि दुर्लक्षित उपचारांमुळे काही रुग्णांच्या स्वायत्त चेतासंस्थेमध्ये बिघाड होतो. त्यामुळे सहजी बरी न होणारी पाठदुखी सुरू होते. सततच्या तीव्र दुखण्याने रुग्ण चिडचिडे होतात. रक्तदाब वाढतो, काहींना नैराश्य येते, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन उपचार करण्याची वेळ येते. रुग्णांच्या कामजीवनावरही याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून कोणत्याही पाठदुखीकडे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स यांनी सहानुभूतीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. काळानुरूप उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. हेच बदल कोअर कन्सेप्टने स्वीकारून वेळीच योग्य उपचार पद्धती उपलब्ध केल्या, त्यामुळे बऱ्याच रुग्णांना पाठदुखीचे दुष्परिणाम टाळण्यात यश मिळाले आहे.

कोअर कन्सेप्ट येथील आधुनिक उपचार पद्धती :

  1. कोरोनाशी लढताना फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग
  2. नॉनसर्जिकल स्पाईनल डिकम्प्रेशन थेरपी (USFDA मान्यताप्राप्त)
  3. कॉम्बिनेशन थेरपी
  4. आर्गोनॉमिक्सबाबत सल्ला
  5. आहाराचे योग्य नियोजनाबाबत सल्ला व मार्गदर्शन
  6. नॉन सर्जिकल हाय पॉवर लेझर थेरपी
  7. कोअर स्टॅबेलिटी व्यायाम पद्धती

वरील आधुनिक उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये

  1. हॉस्पिटलायझेशन नाही
  2. औषधे नाहीत
  3. शस्त्रक्रिया नाही
  4. वेदनारहित उपचार

विशेष टीप : प्रशस्त जागा, क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे संपूर्ण सॅनिटायझेशन, टेम्परेचर, ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केल्यानंतरच पेशंटची पुढील तपासणी केली जाते. (An ISO 9001-2015 Certified Center)

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधू शकता.
स्नेहलीला, दुसरा मजला, आपटे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
मो. ९६७३९९७१०३ / ०२०-२५५३७७०३ अधिक माहितीसाठी coreconcept.in वेबसाइट ला भेट देऊ शकता..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत