अमेरिका : अमेरिकेची कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरने 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात काही निरोगी मुलांना कोरोना लस दिली जाईल. चाचणीसाठी फायझरने जगातील चार देशांतील 4,500 हून अधिक मुलांना निवडले आहे. या चार प्रमुख देशांमध्ये अमेरिका, फिनलँड, पोलंड आणि स्पेनचा समावेश आहे.
फायझरने याबाबत माहिती देताना सांगितले की, “चाचणीच्या पहिल्या टप्प्यात १२ वर्षाखालील मुलांना लस दिली जाईल. जर सर्व काही ठीक झाले तर ही चाचणी पुढे सुरु राहील. कंपनीने पुढे म्हटले की लसीकरणाच्या चाचणीसाठी या आठवड्यात 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना निवडण्याचे काम सुरू केले जाईल. या मुलांना १० मायक्रोग्रामचे दोन डोस दिले जातील. हा डोस प्रौढ आणि वृद्धांना देण्यात येणाऱ्या डोसच्या एक तृतीयांश आहे. यानंतर काही आठवड्यात 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली जाईल. त्यांना तीन मायक्रोग्राम लस दिली जाईल.
Today begins the Phase 2/3 part of our continuous study of the Pfizer – @BioNTech #COVID19 vaccine in healthy children. This is the next step allowing us to gather data to understand the safety and immunogenicity of the vaccine in this group aged 5–11 years.
— Pfizer Inc. (@pfizer) June 8, 2021
वृत्तानुसार, फायझरशिवाय मॉडर्ना देखील 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी घेत आहे. त्याचे निकालही लवकरच बाहेर येऊ शकतात. तसेच, जॉन्सन आणि जॉन्सनकडून अभ्यास केले जात आहेत. गेल्या महिन्यात, अॅस्ट्रॅजेनेकाने 6 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर यूकेमध्ये अभ्यास सुरू केला. या सर्व कंपन्यांना लवकरच सकारात्मक निकाल मिळण्याची आशा आहे.
चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता




