Increased security for National Security Advisor Ajit Doval
देश

दहशतवाद्यानं दिली धक्कादायक कबुली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जैश ए मोहम्मदच्या अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्यानं आपण अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केल्याची कबूली दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानी हॅन्डलरच्या सांगण्यावरून हे केल्याचं त्याने सांगितलं आहे. यानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काश्मीरच्या शोपियाँचा रहिवासी असलेल्या हिदायत उल्लाह मलिक याला ६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. मलिक याच्याजवळ डोवाल यांच्या कार्यालयाच्या रेकीचा एक व्हिडिओ आढळला होता. डोवाल यांच्या कार्यालयाशिवाय श्रीनगरमधील इतरही काही भागांचं व्हिडिओ चित्रीकरण मलिककडे सापडलं होतं. हे व्हिडिओ त्याने पाकिस्तानमध्ये पाठवले होते, असंही सांगण्यात येत आहे.

जम्मूच्या गंग्याल पोलीस स्टेशनमध्ये मलिकविरोधात यूएपीएच्या कलम १८ आणि २० अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मलिक हा जैशच्या ‘लष्कर ए मुस्तफा’ या ग्रुपचा प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे. त्याला अनंतनागमधून हत्यारं आणि स्फोटकांसहीत अटक करण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत